logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रमोद ठोंबरे यांचा ‘उत्कृष्ट मुख्याध्यापक’ म्हणून गौरव; जनता विद्यालयात अभिनंदन सोहळा


बुलढाणा येथे राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते सन्मान

पिंपळगाव सराई (जि. बुलढाणा), दि. ८ एप्रिल – सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘उत्कृष्ट मुख्याध्यापक’ म्हणून सन्मानित झालेल्या प्रमोद ठोंबरे यांचा जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने छोटेखानी पण उत्साहपूर्ण अभिनंदन सोहळ्यात गौरव करण्यात आला.

दिनांक ६ एप्रिल रोजी बुलढाणा येथे सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित सत्कार समारंभात अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक (भाईजी) यांच्या हस्ते जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सन्मानाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमोद ठोंबरे यांना सर्व शिक्षक तथा कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याशिवाय प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका निर्मला खुर्दे व पर्यवेक्षक संजय पिवटे यांचाही सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना प्रमोद ठोंबरे म्हणाले, “यश हे वैयक्तिक नसून ते सामूहिक प्रयत्नांचे फळ असते. या सन्मानामागे आपणा सर्वांचे सहकार्य, अढळ विश्वास व प्रोत्साहन मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे.”

या कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पाटोळे यांनी केले.

48
3490 views

Comment