logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रफुल्ल (पप्पू) खंडागळे यांची भाजप भिवंडी तालुका ग्रामीण (दक्षिण मंडल) ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्षपदी निवड

भिवंडी:
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी भिवंडी तालुका ग्रामीण दक्षिण मंडल कार्यकारिणीमध्ये महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. जनसामान्यांचे नेतृत्व करणारे तडफदार कार्यकर्ते मा. श्री. प्रफुल्ल (पप्पू) खंडागळे यांची 'ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष' पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांना निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रफुल्ल खंडागळे यांच्या निवडीमुळे ओबीसी समाजाच्या प्रश्नांना वाचा फुटेल आणि पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचेल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल बोलताना खंडागळे यांनी सांगितले की, "पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी प्रामाणिकपणे काम करेन आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहीन."
या निवडीबद्दल भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

36
1440 views

Comment