logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शाहूवाडीच्या मागासातून प्रागतिक अत्याधुनिक शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांनो, राजकारण आणून अडथळा ठरु नका....माजी सभापती पाटील

माजी सभापती जि.प.सर्जेराव पाटील यांचा शिक्षक भव्य मेळाव्यात गंभीर इशारा.....*. ‌. ‌ *महादू पवार.,पत्रकार, मुंबई. ‌. ‌कोल्हापूर, शाहूवाडी- छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका शैक्षणिक क्षेत्रात मागास म्हणून ओळखला जातो आहे, केवळ राजकीय सूडबुद्धीने शैक्षणिक मागास ओळख पुसण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन शैक्षणिक विकासासाठी कास धरवी, एवढेच नव्हे तर शैक्षणिक प्रगतीत अडथळा आणणाऱ्या शिक्षक यांची‌ अजिबात गय केली जाणार नाही, असा गंभीर इशारा माजी बांधकाम सभापती जि.प. सदस्य सर्जेराव पाटील यांनी येथे बोलताना दिला. ‌. शाहूवाडी येळाणे येथील मंगल सभागृहात भव्य विद्यार्थी,शिक्षक व नवनियुक्त जिप,पंस सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाहूवाडी पंचायत समिती सभापती रुपाली पाटील, उपसभापती अमर खोत, सौ. गायकवाड,प्रियंका भोसले, स्नेहल वेल्हाळ, सुरेश पवार,माधूरी पाटील, शाहूवाडी शिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सूतार शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‌. यावेळी बोलताना सर्जेराव पाटील म्हणाले की, दहा वर्षापूर्वीच सेमी इंग्रजी आणण्याचा मी‌ प्रस्ताव आणला होता, परंतु राजकारण जाणीवपूर्वक आणले गेल्याने आम्ही शिक्षणापासून दहा वर्षे दूर गेलो आहोत,याचे तरी आत्मचिंतन आत्ता तरी आपण करणार आहोत की नाही,असा सवाल ही सर्जेराव पाटील यांनी लोक प्रतिनिधी, शिक्षकांना करुन आत्मपरिक्षण करायला लावले. शाहूवाडी पन्हाळा लोकप्रिय आ. विनय कोरे सावकार यांच्या निधीतून महाराष्ट्र राज्याला आदर्शवत असे मलकापूर हायस्कूल राज्य शैक्षणिक मॉडेल ठरले आहे,आंबा येथे ८० लाख रुपये खर्चून भव्य इमारत उभी राहिली आहे, एकही शाळा पावसाळ्यात गळणार नाहीत,याचे आश्वासन ही‌ देण्यात आले.पेरीड गाव शैक्षणिक मॉडेल शाहूवाडी तालुक्यात आदर्श ठरेल, अशी ग्वाही ही सर्जेराव पाटील यांनी बोलताना दिली. शाहूवाडी तालुक्यात २८५ शाळा आणि ३५० शिक्षक आहेत आणि 14 संघटना आहेत. शिक्षक बदल्या, आँनलाईन शैक्षणिक व्यतिरीक्त इतर कामे दिली जातात. कोल्हापूर जिल्ह्यात १२,३०० शिक्षक आहेत,अशी माहिती देवून शाहूवाडी तालुक्यातील पटसंख्या शैक्षणिक गळतीबाबत शिक्षक संघटनेचे शिवाजी रोडे पाटील यांनी खंत व्यक्त केली. शाहूवाडी तालुक्यात विविध १४ शिक्षक संघटना आहेत, त्यांनी एकत्र काम केले पाहिजे, शिक्षकांचे मोबाईल कामाच्या वेळी बंद ठेवा,असेही शिवाजी रोडे पाटील म्हणाले.शाहूवाडी शिक्षणाधिकारी डॉ .विश्वास सूतार यांनी मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त जि.प,पं‌.स.सदस्य यांचे आभार मानून शैक्षणिक प्रगतीत हातभार लावण्याचे आवाहन केले. शिक्षणाच्या बळावर भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देवून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, शिक्षण विस्तार अधिकारी भगवान चौगुले,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल कुलकर्णी, केंद्र प्रमुख श्रीकांत गुर्जर यांनी कार्यक्रमाचे सुनियोजन केले.या कार्यक्रमाला आठशे ते नवशे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. *विद्यार्थी,शिक्षक लोकप्रतिनिधी यांचा सन्मान......*. ‌. ‌शाहूवाडी तालुक्यातील मिशन अंकूर, सामान्य ज्ञान परिक्षा गुणवंत विद्यार्थी मार्गदर्शन शिक्षक सन्मान सोहळा नियोजित वेळेपेक्षा विलंबाने सुरु झाला. त्यामुळे घाईघाईत कार्यक्रम उरकण्यात आला. शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सन्मान ऐनवेळी घेण्यात आल्याने शिक्षक यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शिक्षक यांनी एक सूरात महाराष्ट्र गीत गावून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शहीदांना विनम्र अभिवादन केले.

0
81 views

Comment