मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रीय भिक्खू संघाच्या दोन दिवसीय मेळाव्यात बौद्ध धर्मगुरूंमध्ये हमरी तुमरी,बौद्ध उपासक, आंबेडकरी जनतेतून संताप
महादू पवार.,पत्रकार, मुंबई. मुंबई, अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे राष्ट्रीय दोन दिवसीय अधिवेशन गेल्या आठवड्यात चेंबूर येथील सर्वोदय बुद्ध विहारांमध्ये पार पडले. या अधिवेशनामध्ये बौद्ध धर्मगुरुमध्येच खाजगी नावावरुन हमरीतुमरीची घटना घडल्याने त्याची सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली आहे. या घटनेमुळे बौद्ध उपासक आणि आंबेडकरी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बौद्ध धर्मगुरु हे बौध्द धम्म प्रसारक असताना आपसातील व्यक्तीगत वाद चव्हाट्यावर आल्याने बौध्द भिक्खू धम्म प्रसार, प्रसार की व्यक्तीगत हेवेदावे करण्यासाठी कार्यरत आहेत, जोरदार टिका आंबेडकरी जनतेतील अभ्यासक विचारवंत करु लागले आहेत. . मुंबईतील चेंबूर येथील सर्वोदय बुद्ध विहाराच्या पटांगणात दोन दिवसीय भिक्खू संघाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला जागतिक क्षेत्रातील बौद्ध धर्मगुरु उपस्थित झाले होते.या अधिवेशनाचे उद्घाटन विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उद्घघाटन पार पडले. उपसभापती भाषण करुन सभामंचावरुन निघाले असता मंचावर बसलेले आणि समोर बसलेल्या भिक्खूमधून संताप आणि एकदुस-याविरोधात शेरीबाजू करून हमारी तुमरीची घटना घडली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन मोरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लागलीच धाव घेतल्याने पुढील प्रसंग टळला. भिक्खू संघात नेमक्या कोणत्या कारणामुळे वाद झाला, त्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, या प्रकरणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भदंत राहुल बोधी आणि जेष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. . . चौकट...... . *भदंत राहूल बोधी यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे पडसाद ......* . अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष डॉ. राहूल बोधी यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित झाले होते . यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी या बुद्ध विहाराला करोडो रुपयांची मदत केल्याचे जाहीर करताच हा मदतीचा अकडा कमी सांगितला गेल्याने पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नाराजी व्यक्त केली.त्यानंतर ना. लोढा हे संतापाच्या भरात निघून गेले.त्याचवेळी अमरावतीमधून आलेले कर्णबधीर अपंगत्व विद्यार्थी यांना कोणतीच मदत झाली नसल्याने शाळा संचालक आणि विद्यार्थी यांनी नाराजी व्यक्त करीत पुढील शैक्षणिक भवितव्याचे काय ? अशा संतप्त प्रतिक्रिया पत्रकार यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या.