नाशिक मध्ये नामांकित IT कंपनीत टीम मॅनेजरकडून तरुणींवर अत्याचार, 6 नराधमांना अटक
नाशिक हादरले! नामांकित IT कंपनीत टीम मॅनेजरकडून तरुणींवर अत्याचार, 6 नराधमांना अटक
नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अशोक खरात प्रकरणाने नाशिक शहरात खळूळ उडाली असताना कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक घटना नाशिकमधून समोर आली आहे. एका नामांकित आयटी (IT) कंपनीत कामाला असलेल्या 18 ते 25 वयोगटातील तरुण मुलींचे लैंगिक, मानसिक शोषण आणि विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.