logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*ब्रेकिंग न्यूज | हिंगणा तालुक्यात जमीन घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश*? *“बेकायदेशीर लेआउट टाकून नागरिकांची फसवणूक*!”

*ब्रेकिंग न्यूज | हिंगणा तालुक्यात जमीन घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश*?
*“बेकायदेशीर लेआउट टाकून नागरिकांची फसवणूक*!”

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात मौजा वागधरा (इसासनी) येथे शहाकार गृह निर्माण सरकारी संस्था, नागपूर यांच्यावर गंभीर आरोप समोर आले आहेत. नियमांना धाब्यावर बसवत ग्रामीण भागात बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी करून भूखंड तयार करण्यात आले आणि राजू सेवकराम शहाकार यांनी आममुखत्यार पत्राद्वारे नागरिकांना प्लॉट विक्री केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही संस्था नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोंद असतानाही ग्रामीण भागात व्यवहार करू शकत नाही, त्यामुळे हा संपूर्ण लेआउट बेकायदेशीर ठरत आहे.

स्थानिक माहितीप्रमाणे, अशा बेकायदेशीर लेआउटवर ग्रामपंचायत कोणतेही विकासकाम करू शकत नाही, त्यामुळे भविष्यात नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. याआधीही अशाच प्रकारच्या प्रकरणात संस्थापक अध्यक्ष स्व. सेवकराम दिनबाजी शहाकार आणि सतीश भाऊराव शहाकार यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सध्या जिल्हा निबंधक कार्यालय, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालय स्तरावर चौकशी व कारवाई सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर गजानन ढाकुलकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तिची संपूर्ण कायदेशीर पडताळणी करा, अन्यथा फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
2653 views

Comment