गैरव्यवहार करणाऱ्या फाउंडेशन चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी -भीम आर्मी
* *बेकायदेशीर गैरव्यवहार करणाऱ्या हार्मनी फाऊंडेशन कंपनीची सीबीआयकडून कसून चौकशी करा.......* *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भीम आर्मी महाराष्ट्रची जाहीर मागणी....*. . मुंबई, केरळ येथील संस्थापक अब्राहम मथाई यांच्या हार्मनी फाउंडेशन या धर्मांतरीत आणि विविध प्रकारचे बनावट आयडीचा गैरव्यवहार करणाऱ्या प्रकरणाची सीबीआय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने कसून चौकशी करण्याची मागणी भीम आर्मी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष महादू पवार यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या चौकशीमुळे अनेक आर्थिक आणि धार्मिकतेच्या नावावर सुरु असलेल्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे, या चौकशी मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे. . केरळस्थित या कंपनीचे कामकाज मुंबई सांताक्रूझ कालीना येथून सुरू आहे.अनेक संशयास्पद विदेशी कंपन्यांनी हार्मनी फाउंडेशनमध्ये छुपी गुंतवणूक केलेली आहे.त्या सर्व व्यवहारांची कसून चौकशी करण्यात यावी, हार्मनीच्या दुबई आणि सिंगापूर मध्ये मॅक्सन्स आणि इतर पायाभूत सुविधांवर आधारित कंपन्यांसारख्या अनेक शेल उपकंपन्या आहेत. या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीसाठी केला जात असल्याचे सीबीआय चौकशीत उघडकीस येईल,असेही भीम आर्मी महाराष्ट्र यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. हार्मनी फाऊंडेशनच्या कलिना कार्यालयात हिंदू देवदेवतांची तसेच महिलांचे लैंगिक शोषणाच्या अनेक प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे या कंपनीकडे उत्पन्नाचा कोणताही कायदेशीर स्त्रोत नाही. याउलट बेकायदेशीर व्यवहारांचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतील मिनीरोज अपार्टमेंटमधील आठ अपार्टमेंट्स कोणत्या आधारावर खरेदी करण्यात आले? ही बाब पोलीस चौकशीत स्पष्ट करावी, एवढेच नव्हे तर मॅक्सन्सने परदेशातील रोजगारात मोठा घोटाळा केला असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगण्यात आले. मिथाईकडून बनावट डॉक्टरेट पदवीचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.या फसवणूकीच्या कारवायांमध्ये प्रतिबंधित कॉलर आयडी सारख्या नंबरचा बेकायदा सर्रास वापर केला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.या व्यतिरिक्त मदर तेरेसा अवार्ड्स,पीवाजे सारख्या अनेक पुरस्कार आधारित कार्यक्रमांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.या संबंधित कंपनांशी असलेल्या नाते संबंधांचा शोध घेवून सत्य बाब भारतीय जनतेसमोर आली पाहिजे, अशी मागणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लिखीत स्वरुपात करण्यात आली आहे.