logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बेरोजगारांसाठी व्हिडियोग्राफी, फोटोग्राफी व* *मोबाईल रिपेरिंग व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण*

*बेरोजगारांसाठी व्हिडियोग्राफी, फोटोग्राफी व*
*मोबाईल रिपेरिंग व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण*
गोंदिया, दि.8 : जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा बँक च्या वतीने कुडवा, गोंदिया येथे 2011 पासून कार्यरत आहे. या संस्थेने आजपर्यंत 10368 युवक-युवतींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे 7875 युवक-युवतींना रोजगार प्राप्त झालेला आहे. संस्थेच्या माध्यमातून देण्यात घेणारे प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत असून संस्थेमध्येच मोफत निवास, भोजन, चहा व नाश्ता ची सोय उपलब्ध करून दिली जाते. प्रशिक्षणादरम्यान मोफत गणवेश, स्टेशनरी व प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून दिले जात असून प्रशिक्षणामध्ये संबंधीत व्यवसायाचे 75% प्रात्यक्षिक व 25% थेअरी प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच 21 व्या शतकाचे व्यावसायिक कौशल्य उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास (एडप), संवाद कौशल्य, मार्केटिंग कौशल्य, डिजिटल कौशल्य, संगणक कौशल्य व पर्यावरण कौशल्य अशाप्रकारचे कौशल्य प्रशिक्षणार्थीमध्ये विकसीत करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी तयार केले जाते. एप्रिल व मे महिन्यामध्ये सदर प्रशिक्षण आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.
दिनांक 10 एप्रिल ते 5 मे 2026 पर्यंत व्हिडियोग्राफी व फोटोग्राफी प्रशिक्षण. 13 एप्रिल ते 12 मे 2026 पर्यंत मोबाईल रिपेरिंगचे प्रशिक्षण. 10 मे ते 9 जून 2026 पर्यंत इलेक्ट्रिक मोटर रिवायंडींगचे प्रशिक्षण. 17 मे ते 29 मे 2026 पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉलेशनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण हे ग्रामीण भागातील 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक व युवतींसाठी नि:शुल्क असून प्रशिक्षणार्थी संस्थेमध्ये मोफत राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध असणार आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. ग्रामीण भागातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येईल.
तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज निदेशक, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वाहणे पॅलेस, हरिणखेडे पेट्रोलपंप जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे त्वरित जमा करावे. अधिक माहितीसाठी संपर्क 9764087919/ 8698140105/ 9834895077 यावर संपर्क साधावा, असे बँक ऑफ इंडिया, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे निदेशक अब्दुल वसीम यांनी कळविले आहे.
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
महेंद्र कनोजे

4
712 views

Comment