जागतिक चिमणी दिनानिमित्त तयार केलेले घरटे विद्यालयात लावण्यात आले.
आमच्या जनता विद्यालयात आज एक सुंदर आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून चिमण्यांसाठी घरटी आणि पाण्याची भांडी तयार केली.
ही सर्व घरटी व भांडी शालेय परिसरात प्रेमाने आणि उत्साहाने लावण्यात आली.
“दाणापाणी उपक्रम” सुद्धा आज सुरू करण्यात आला,
ज्यामुळे आपल्या लाडक्या चिऊताई साठी अन्न आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये
निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली.
या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक संजय पिवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाचे संयोजन इको क्लब प्रभारी देविदास दळवी यांनी केले. पर्यावरण प्रेमी, कलाशिक्षक रवींद्र खानंदे यांच्या कल्पकतेतून घरट्यांची स्थान निश्चिती करून घरटे लावण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.
त्यांच्या या प्रयत्नांमुळे चिमण्या पुन्हा आपल्या परिसरात
आनंदाने किलबिलाट करतील, अशी आशा आहे!