पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ
जळगाव : माहेरून पाच लाख रुपये व
सोन्याचे दागिने आणावे यासाठी महेक अजीम शाह (वय २३) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. हा प्रकार २०२१ पासून सुरू होता. या प्रकरणी विवाहितेने ६ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकॉ जयेश मोरे करीत आहेत.