logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पटपडताळणीला विरोध; पुढील शैक्षणिक वर्षातच प्रक्रिया – आमदार सत्यजित तांबे यांची मागणी

दिनांक ०७/०४/२०२६
आरिफ खान
(जिल्हा प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या काळात पटपडताळणी करण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवत आमदार सत्यजित तांबे यांनी ही प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला राबवावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.

शासनाने दिनांक ११, १५ आणि १८ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांच्या परीक्षेदरम्यान पटपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या काळात विद्यार्थी व शिक्षक परीक्षा कामकाजात व्यस्त असल्याने या प्रक्रियेचा त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पडताळणी जुलै-ऑगस्ट महिन्यात, नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर करण्यात यावी, असे तांबे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, २०१२ ते २० या कालावधीत अनेक शाळांना विनाअनुदान तत्त्वावर कायम मान्यता देण्यात आली होती. या शाळांना अनुदानाच्या टप्प्यावर येण्यासाठी दोन ते तीन वेळा मूल्यांकन प्रक्रियेतून जावे लागले. काही शाळांच्या तुकड्या निकषांमध्ये बसल्या नसल्या तरी त्यांनी नंतर आवश्यक त्रुटी दूर करून पुन्हा मूल्यांकन पूर्ण केले आहे.

असे असतानाही शासनाने संबंधित शाळांना ‘स्वयं अर्थसहाय्यित’ धोरणात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्था चालकांमध्ये नाराजी पसरली आहे. विनाअनुदान तत्त्वावर दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचे योगदान या निर्णयामुळे दुर्लक्षित होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्वयं अर्थसहाय्यित धोरणानुसार शाळांनी स्वतःच फी गोळा करून खर्च भागवायचा असतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

यामुळे, यापूर्वी विनाअनुदान तत्त्वावर मान्यता मिळालेल्या शाळांचे पुनर्मूल्यांकन करून त्यांना अनुदानाच्या टप्प्यावर आणावे, अशी मागणी आमदार तांबे यांनी शासनाकडे केली आहे.

या मागणीला माध्यमिक संघटनेचे श्री एस डी भिरुड सर,यु यु दादा पाटील, श्री जे के पाटील,श्री आर एच बाविस्कर ,संभाजी पाटील,श्री एच जी इंगळे, श्री एस के पाटील,जुनिअर कॉलेज संघटनेचे प्रा सुनील गरुड, प्रा.शैलेश राणे, प्रा.नंदन वळींकार, प्रा.सुनील सोनार प्रा सुनील पाटील प्रा.राजेंद्र चव्हाण प्रा अतुल इंगळे, टीडीएफचे डी ए पाटील सौं पुष्पा पाटील , कलाध्यापक संघटनेचे अरुण सपकाळे ,एन ओ चौधरी हरीश तळेले, मुख्याध्यापक संघटना श्रीमती साधना लोखंडे ,जे पी सपकाळे ,तुषार बोरसे,कास्ट्राईब संघटना डॉ संजय निकम ,शिक्षकेतर कर्मचारी संघटना डिगंबर पाटील,संदीप डोलारे ,योगेश भोईटे, यासह विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे. संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यातील विविध आमदारांमार्फत शासनापर्यंत आपली भूमिका पोहोचवली असून, लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0
110 views

Comment