logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न!

छत्रपती संभाजीनगर / जळगांव
दिनांक ०७/०४/२०२६
`महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे चेअरमन हसीन अख्तर आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह मान्यवरांचे शुभहस्ते 22 शिक्षकांचा सन्मान!

छत्रपती संभाजीनगर : हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनच्या वतीने आयोजित १२ व्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आणि 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५' वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर येथे अत्यंत थाटात पार पडला. या कार्यक्रमात एकूण २२ शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
*प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती...*
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे चेअरमन (राज्यमंत्री दर्जा) ना. हसीन अख्तर होते. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, सत्कारमूर्ती जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, आणि महिला व बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगल पांचाळ, माजी नगरसेवक कॉ. शेख बाबू यांची उपस्थिती होती.

*शिक्षक संघटनेचे नेते मंडळी यांची विशेष उपस्थिती...*
राष्ट्रवादी शिक्षक संघाचे प्रदीप विखे, एम एम खुटे, रमाकांत शिक्षक नेते तसेच आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे, ज्ञानेश्वर पठाडे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे, शिक्षक भारती उर्दु चे मो. अजहर, उर्दू शिक्षक संघटनेचे देशमुख जावेद, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन वाघ, आय विटनेसचे डॉ. प्रा. शाहेद सर आदी संघटनेचे नेते व पदाधिकारी या सोहळ्यासाठी खास उपस्थित होते...

> पुरस्कारांचे स्वरूप
*राज्यस्तरीय निबंध स्पर्धा:* ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, शानदार ट्रॉफी, पुस्तक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
*राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार:* राज्यातील ६ उत्कृष्ठ शिक्षकांना प्रदान करण्यात आले.
*जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार:* ९ शिक्षकांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
*मान्यवरांचे मार्गदर्शन*
> "हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षकांनी आपली जबाबदारी खंबीरपणे पार पाडावी, रहीम सर आणि त्यांची टीम १२ वर्षांपासून शिक्षकांना प्रोत्साहित करण्याचे उत्तम कार्य करत आहे."
> — ना. हसीन अख्तर (चेअरमन, उर्दू साहित्य अकादमी)
>
> "हे फाउंडेशन सदैव विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडत असून त्यांना यशही मिळत आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे आता शिक्षकांची जबाबदारी अधिक वाढली आहे."
> — विक्रम काळे (शिक्षक आमदार)
>
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
*सत्कार:* हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनच्या परंपरेनुसार सर्व पाहुण्यांचे स्वागत पुस्तक, शाल आणि मोमेंटो देऊन करण्यात आले.
*सुरुवात व सांगता:* कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने, तर सांगता राष्ट्रगीताने झाली.
*नियोजन:* कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुजीब आलम खान यांनी केले, तर प्रास्ताविक शेख अब्दुल रहीम यांनी मांडले. आभार प्रदर्शन शफिक पठाण यांनी केले.
*यशस्वितेसाठी प्रयत्न:* हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांच्यासह शेख शब्बीर, शफीक पठाण, शाहरुख पठाण, शेख साबीर, सय्यद ताजीम, इलियास सिद्दीकी, शेख यासेर, शेख अरमान, फरमान खान, शेख अफसर, शेख शकूर, शेख इलियास, शेख जफर, वसीम खान, अमोल कुळकर्णी, मतीन खान, रियाज शेख, मुजम्मील (MK) आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. `कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.`

40
777 views

Comment