logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त कोल्हापूर जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर, दि. ०७ ( प्रतिनिधी )
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 8 ते 14 एप्रिलपर्यंत विभागातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, निवासी शाळा तसेच जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रबोधनात्मक व्याख्याने, विविध योजनांच्या कार्यशाळा, तसेच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वाटप करणे, ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान इ. सामाजिक उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याकरिता जिल्ह्यातील सर्व शिव- फुले-शाहू-आंबेडकर अनुयायी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांनी सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0231-2651318 या क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

5
54 views

Comment