Aima midiya jan jan ki avaj Date 7.4.2026 2:35 pmधक्कादायक सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक
या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्
Aima midiya jan jan ki avaj Date 7.4.2026 2:35 pmधक्कादायक सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक
या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पुणे : सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. हडपसर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील भोसलेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी जानेवारी महिन्यात ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक योजनांची माहिती देऊन त्यांना जाळ्यात ओढले. शेअर बाजराात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी त्यांच्याकडून गेल्या तीन महिन्यात वेळोवेळी १२ कोटी ३१ लाख रुपये घेतले. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी पैसे जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासविले. मात्र, प्रत्यक्षात चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चोरट्यंनी ज्या खात्यात पैसे जमा करुन घेतले. त्या बँक खात्याची तांत्रिक पडताळणी सुरूकरण्यात आली आहे. पोलिसांकडून संबंधित बंँकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.