logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वंचित आघाडीकडून चूल पेटवून शासनाचा निषेध



जळगाव : : गैस टंचाईमुळे सर्वर

सर्वसामान्य जनतेचे हाल होत असताना, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चुली पेटवून आणि त्यावर स्वयंपाक करून केंद्र व राज्य सरकारचा अनोखा निषेध नोंदवला.

पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अकोला आणि अमरावती येथे गॅससाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. गॅसअभावी घरगुती स्वयंपाक घरांपासून ते चहाच्या टपऱ्या, खानावळी आणि केटरिंग व हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त बाहेर राहणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ईश्वर पाटील, शमिभा पाटील, जितेंद्र केकार, विजय पाटील यांनी केले.

3
58 views

Comment