*पालकमंत्री विखे पाटील यांची भाजपा स्थापनादिनी अनोखी भेट ! तनपुरेंची माघार* !!
*पालकमंत्री विखे पाटील यांची भाजपा स्थापनादिनी अनोखी भेट ! तनपुरेंची माघार* !!
राहुरी (शिवप्रहार न्युज ) आज ०६ एप्रिल २०२६ रोजी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे जेष्ठ नेते,जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री.चव्हाण यांना घेवून थेट राहुरीत येवून संभाव्य विरोधी उमेदवार श्री.प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली.त्यानंतर राजकीय घडामोडी घडत आज शेवटच्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही.
आता भाजपाचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डीले यांना ही निवडणुक सोपी झाल्याचे मानले जात आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना राजकीय 'झटका' दिला असून आता अपक्ष किंवा शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार माघारीच्या दिवसापर्यंत ' दम ' धरतील का ? का त्यांची पण भाजपा' दमछाक ' करणार हे पहावे लागेल.
एक मात्र नक्की झाले की तनपुरेची माघार घडवून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपाला स्थापना दिनाच्या दिवशी भाजपा जिल्हयात आणखी भक्कम केली .
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015