logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गुंडापली येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते संपन्न

गुंडापली तह. चामोर्शी जिल्हा. गडचिरोली येथे दोन दिवसीय भव्य आदिवासी महोत्सव दिनांक. 28 ते 29 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी आदिवासिंचे मसीहा भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. डॉ. मिलिंदजी नरोटे ह्यांच्या हस्ते आणि मा.श्री. अजय भाऊ कंकडालवार अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. श्री. मडावी साहेब ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.ह्या दोन दिवसीय मोहत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते. श्री. कुमरे सर यांच्या मुलाने काढलेले चित्र अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या पदावर कार्यरत गावातील अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवसीय आदिवासी मोहत्सवात गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील बहुसंख्य बांधव उपस्थित होते. कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता सगळ्यांचे सहकार्य लाभले.

17
5506 views

Comment