नाशिक मा. जयश्रीताई आहिरे यांचा समाजकार्याबद्दल गौरव, राज्यस्तरीय सन्मान प्रदान
माननीय श्री संस्थापक अध्यक्ष रवींद्रजी सूर्यवंशी साहेब युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना च्या माध्यमातून समाजहिताचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मा. जयश्रीताई आहिरे (राष्ट्रीय युवती अध्यक्षा) यांचा सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जयश्रीताई आहिरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
या सन्मानामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून युवा क्रांती संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आहिरे ताई यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
👉 आहिरे ताई, आपले मनःपूर्वक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन! 🌹🙏😊