माझं गाव.... माझी ओळख .... शिक्षक दिलीप भिसडे यांचा स्तुत्य उपक्रम
माझं गाव.... माझी ओळख .... शिक्षक दिलीप भिसडे यांचा स्तुत्य उपक्रम
कोयाळी गावाचे सण-समारंभ म्हणजे एक मोठा उत्सवच असायचा. दिवाळी, पोळा, आणि गणेशोत्सव, दुर्गादेवी, भागवत सप्ताह .... अशा विविध सणसमारंभात सर्व जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात.गावात एकोपा आणि आनंदाचे वातावरण निर्माण करतात. गावची यात्रा, पालखी, आणि भजनांचे कार्यक्रम आजही मनात घर करून आहेत. गावातील लोक आपापसात प्रेमाने वागतात. आज मी भलेही शहरात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आलो असेल, पण माझे मन आजही त्या आपल्या कोयाळी गावातच रमते. त्या गावातील मातीचा सुगंध, लोकांचे प्रेम आणि बालपणीच्या आठवणी मला नेहमीच प्रेरणा देतात. गाव म्हणजे फक्त घर नाही, तर ती माझी ओळख आहे आणि म्हणूनच गावासाठी... गावातील तरुणांसाठी माझ्या डोक्यात एक विचार आला... तो असा...
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सुराज्य हा उद्देश ठेवला होता. आपला माणूस आपल्यापेक्षा मोठा व्हायला पाहिजे, असे त्यांचे स्वप्न होते. शिवरायांचे विचार अंगीकारत आजचा तरुण प्रत्येक क्षेत्रात दैदीप्यमान यश संपादन करत आहे. अशा विविध क्षेत्रातील यशकर्त्यांना यशाचे शिलेदार म्हणून त्यांचा गौरव झाला पाहिजे, स्वतःपेक्षा इतरांची उन्नती व्हावी व इतरांच्या यशामध्ये आपले यश मानले पाहिजे. अशा यशाच्या शिल्पकारांना एकत्र आणून त्यांचा गौरव केला पाहिजे. हे यशाचे शिल्पकार माझ्यापेक्षाही मोठे आहेत. म्हणूनभागवत सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील अशा गुणवंत तरुणांचा सन्मान गावातील ज्येष्ठ आणि वडीलधारी मंडळीं पोलीस पाटील बालाजी भिसडे, आदर्श शिक्षक कचरूजी भिसडे,शंकरराव भिसडे, रामदास भिसडे, संतोषराव भिसडे, भुजंगराव भिसडे, उपसरपंच दत्तराव भिसडे, व गावातील बहुसंख्य ज्येष्ठ वडीलधारी मंडळी उपस्थित होती. वरील मान्यवरांच्या शुभहस्ते यशवंत विद्यार्थ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने...
१)वैभव रामदास भिसडे (रेल्वे पोलीस स्पेशल फोर्स )
२)सोपान दिनकर भिसडे (लिपिक महानगर पालिका मुंबई )
३)किशोर कैलास भिसडे (अडव्होकेट)
४)ज्ञानेश्वर बालाजी भिसडे (लिपिक जि. सा.रु.वाशिम )
५)शुभांगी अनिल भिसडे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ जि.सा.रु.वाशिम.....