धुळ्यात गावठी कट्टा व काडतूस जप्त
धुळे : शहरातील पांझरा नदीकाठी गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला देवपूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक समाधान वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली. पांझरा नदीकिनारी एक इसम गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती देवपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पीआय समाधान वाघ यांच्या पथकाने तातडीने नदीपात्राकडे धाव घेतली. यावेळी एक तरुण हातात कट्टा घेऊन मिरवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.