logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भंडाऱ्यात संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानाची मशाल पेटली!

भंडाऱ्यात संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानाची मशाल पेटली!

विलास केजरकर भंडारा.

भंडारा :- संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियान अंर्तगत एक दिवसीय सामाजिक प्रशिक्षण शिबिर लाल बहादूर शास्त्री विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
प्रशिक्षण कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून अमरावती येथील सेवानिवृत्त प्रा. प्रफुल कडू होते. प्रमुख पाहुणे म्हणून संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानचे जिल्हा आयोजक रुपेश टांगले, आयोजक अजय रेहपाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी विज्ञान युग, लोक स्वराज्य व संविधान तसेच आजची राजकीय परिस्थिती यावर विषयांवर विविध मार्मिक उदाहरण देऊन समाज प्रबोधनावर मार्गदर्शन करण्यात आले.
त्याप्रसंगी डॉ. आशिष माटे, डॉ. गुरूप्रसाद पाकमोडे, धर्मराज तिवडे, सौं. मनिषा भांडारकर, कु. कोमल दुबे, मो. सईद शेख, ओबीसी संघटना जिल्हा समन्वयक के. झेड. शेन्डे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियान जिल्हा संयोजक सुरेश भावसागर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते किसन शेंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धिरज बोंदरे, ज्ञानेश्वर बेंदेवार, सेवक हातझाडे, हेमंत लोंदासे, सुभम सिंगनजुडे, संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

13
1218 views

Comment