नाशिक डिंडोरीत भीषण अपघात
👉 एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील डिंडोरी परिसरात एक भीषण अपघात झाला असून, एका कारमध्ये प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार, ही कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या विहिरीत कोसळली।
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, कारण त्या विहिरीभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा इशारा फलक नव्हता।
सध्या पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे।
रिपोर्टर
अमर शिवाजी पठारे
नाशिक महाराष्ट्र