मेहकर बस आगारात लवकरच १५ नवीन एस.टी. बस दाखल !
प्रतिनिधि/सद्दाम खान .. मंत्री, प्रताप सरनाईक यांचे आश्वासन !!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यात लवकरच ३००० एस टी बसेस उपलब्ध होणार असून बुलढाणा जिल्ह्यात एकूण ८० तर मेहकर बस आगारात लवकरच १५ एस टी बस दाखल होणार !!
या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांची विधान सभेत भेट घेऊन मेहकर बस आगारासाठी नवीन ३३ एस टी बसची मागणी केली असता बुलढाणा जिल्हाला ८० तर मेहकर आगारासाठी १५ नवीन एस टी बस उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले.
बुलढाणा जिल्ह्यातील अन्य आगारांना १० बस मिळणार असून केवळ मेहकर व खामगाव आगारासाठी प्रत्येकी १५ एसटी बस देण्यात येतील असे मंत्री, प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
उर्वरीत एस टी बस आणखी काही कालावधी नंतर देण्यात येतील असेही मंत्री, प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
मेहकर विभागात बंद झालेल्या व नवीन बस मार्गासाठी शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे.
मेहकरच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा, प्रगतीच्या मार्गावर एक मोठं पाऊल !