logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांची हातसफाई



जळगाव : दाम्पत्य मुलाकडे गेलेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातून गॅस सिलिंडर व पाण्याची मोटर असा एकूण सहा हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणी २ रोजी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झालेले मनोहर सुकलाल ठाकरे (७४, रा. भिकमचंद जैननगर) हे पत्नीसह ४ मार्च रोजी ठाणे येथे मुलाकडे गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातून गॅस सिलिंडर व पाण्याची मोटर चोरून नेली. १ एप्रिल रोजी हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला. त्यांनी माहिती दिल्यानंतर ठाकरे हे घरी परतले. याविषयी शहर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13
356 views
1 shares

Comment