logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मतदार यादी विशेष सखोल पुर्नरिक्षण मोहिमेसाठी जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी विशेष शिबिरांचे आयोजन

मतदार यादी विशेष सखोल पुर्नरिक्षण मोहिमेसाठी जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी विशेष शिबिरांचे आयोजन
(तालुका प्रतिनिधी):
नाशिक, दि. 2 एप्रिल 2026
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी काळात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुर्नरक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील नावे अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी व्यापक पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत मतदारांना प्रत्यक्ष पडताळणीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. मतदार नागरीकांनी आपल्या नावाची पडताळणी करून आवश्यक ती माहिती सादर करावी, तसेच नावांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

या मोहिमेद्वारे ज्या मतदारांची नावे सन 2024 च्या मतदार यादीत समाविष्ट आहेत, त्यांच्या नावांची सन 2002 च्या मतदार यादीतील नावाशी मॅपिंग करण्यात येणार आहे. तसेच ज्या मतदारांची नावे सन 2024 मध्ये आहेत, मात्र सन 2002 मध्ये नसतील, अशा मतदारांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाचे सन 2002 च्या मतदार यादीमधील नावाशी मॅपिंग करण्यात येणार आहे. तसेच ज्या मतदाराचे नाव सन 2024 च्या मतदार यादीत समाविष्ट आहे परंतु त्या मतदाराचे आई वडील किंवा आजी आजोब यांचे नाव सन 2002 च्या मतदार यादीत नाही अशा मतदाराच्या राहत्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष गृहभेट देतील. त्यानंतर त्यांचे आई-वडील किंवा आजी-आजोबा यांचे मूळ रहिवासाचे ठिकाण याबाबत माहिती घेतील.यामध्ये (राज्य, जिल्हा, तालुका, गाव) देखील नोंदविण्यात येईल.यासोबतच, विवाहानंतर स्थलांतरित झालेल्या महिलांच्या बाबतीत त्यांच्या मूळ गावातील कुटुंबीयांची माहिती संकलित करून त्यांची पडताळणी केली जाणार आहे. ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर ती https://voters.eci.gov.in⁠ या संकेतस्थळावर अपलोड करून सन २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारांनी. विशेष शिबिराचा लाभ घेऊन मतदार याद्या अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, श्री प्रसाद यांनी केले आहे.

8
15 views

Comment