logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आंबापाडा येथे पारंपरिक पाटली पूजन कार्यक्रम संपन्न

. साक्री तालुक्यातील आंबापाडा येथे आज आदिवासी परंपरेनुसार पाटली पूजनाचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शिंदे परिवारातील सर्व सदस्य मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते.

आदिवासी संस्कृतीत ‘पाटली’ ही एक महत्त्वाची परंपरा मानली जाते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर त्याच्या स्मरणार्थ दगडावर पाटली घडवून त्याची पूजा केली जाते. या विधीमुळे त्या व्यक्तीच्या आठवणींना जपण्यासोबतच कुटुंबीयांमध्ये एकोप्याची भावना अधिक दृढ होते.

आज झालेल्या पूजनात पारंपरिक विधी, पूजा-अर्चा आणि कुटुंबीयांची उपस्थिती यामुळे वातावरण अत्यंत भावनिक व श्रद्धामय झाले होते. या कार्यक्रमातून आदिवासी समाजातील परंपरा आणि संस्कृतीचे जतन आजही कायम असल्याचे दिसून आले.

अशा पारंपरिक उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होत असून, समाजात एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.

0
12 views

Comment