लोंढे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत चार्जशीट दाखल
NASHIK : लोंढे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत चार्जशीट दाखल..खंडणी, गोळीबार, अवैध कब्जा, जीवे मारण्याचा प्रयत्न, धमकी, शस्त्र बाळगणे, लुटमार आदी गंभीर गुन्ह्यांत सहभाग निष्पन्न झाला. परिमंडळ २ कार्यालयाने लोंढे टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. पोलिस आयुक्तांनी महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांच्याकडे मंजुरीकरिता पाठवला होता. चौकशीत लोंढे पिता-पुत्रांसह दोघांचा सहभाग निष्पन्न झाला..लोंढे टोळीच्या पाच सदस्यांवर अखेर मोक्का कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आली. कायदा सुव्यवस्था महासंचालक यांच्याकडे मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, यास मंजुरी देण्यात आली आहे
लोंढे टोळीच्या ११ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था महासंचालकांनी प्रस्तावाची पडताळणी करत्न माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचे दोन पुत्र दीपक लोंढे, टोळीचा म्होरक्या भूषण लोंढे, वेदांत चाळगे, शुभम उर्फ भुरा पाटील यांचा संघटीत गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला.