logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तुकाराम मुंढेंची २५ वी बदली; आता 'आपत्ती व्यवस्थापन'

तुकाराम मुंढेंची २५ वी बदली; आता 'आपत्ती व्यवस्थापन'

विलास केजरकर भंडारा.

मुंबई :- धडाकेबाज निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून नुकतीच बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने बुधवारला राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
त्यात सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव या पदावर मंत्रालयात करण्यात आली आहे. जवळपास २१ व्या कारकिर्दीत त्यांची ही २५ वी बदली आहे. मुंढे यांनी दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्रे जोडून नोकऱ्या मिळविणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना निलंबित करणे, बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द करणे, बोगस प्रमाणपत्रे देणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करणे असा सपाटाच त्यांनी लावला होता.
आता सहा महिन्यांत त्यांची पुन्हा बदली करण्यात आली. मुंढे यांनी 'दिव्यांग कल्याण'मधील अनेक गैरप्रकार समोर आणले असताना त्यांची बदली झाली. त्यामुळे गैरप्रकारांना पुढेही चाप बसेल की मुंडेंच्या बदलीने त्यावर पांघरूण घातले जाईल असा प्रश्न जनसामान्यांनी उपस्थित केला आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
93 views

Comment