logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तमाशा कलावंतांना मारहाण प्रकरणातील चौघांना अटक

अहिल्यानगर प्रतिनिधी - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला एका वाहनचालकाने कट मारत कलावंतांना बेदम मारहाण केल्याने आठजण जखमी झाले आहेत, तसेच महिला कलावंतांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांत चौघांसह अनोळखी दहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक देखील केली आहे.

वरूडी पठार येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर तमाशा कलावंत पुढे निघाले असता, एका वाहनाने त्यांच्या वाहनाला कट मारला.यानंतर संबंधित वाहनचालकाने आपले वाहन आडवे लावत तमाशा कलावंतांच्या चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने इतर काही जणांना बोलावून घेत सर्वांनी मिळून कलावंतांना मारहाण केली, तसेच महिला कलावंतांचा विनयभंग करत दोन तोळ्याची सोन्याची साखळी व सव्वादोन लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी कैलास सावंत (वय ५९, रा. नारायणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमित गुंजाळ (वय २६), संकेत बांगर (वय ३०), सोमेश बोंबले (वय ३१), दत्तात्रय पडवळ (वय ३२, सर्व रा. कर्जुले पठार, ता. संगमनेर) व इतर अनोळखी दहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित आरोपींचा तपास घारगाव पोलिस करीत आहेत.

5
342 views

Comment