logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत जळगाव जिल्ह्याचा विकास पथावर ऐतिहासिक टप्पा: सलग चौथ्या वर्षी राज्यात अव्वल....!

जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत जळगाव जिल्ह्याचा विकास पथावर ऐतिहासिक टप्पा: सलग चौथ्या वर्षी राज्यात अव्वल नंबर आला आहे.

दिनांक: ०१ एप्रिल, २०२६
स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजनात आणि काटेकोर अंमलबजावणीत जळगाव जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), आदिवासी घटक कार्यक्रम (TSP/OTSP) आणि अनुसूचित जाती घटक कार्यक्रम (SCP) अंतर्गत प्राप्त १००% निधी विहित वेळेत खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

उल्लेखनीय प्रशासकीय यश आणि गौरव:
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्ह्याचे मा. पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेचा गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने खालील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला:
जिल्हाधिकारी जळगाव
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
पोलीस अधीक्षक, जळगाव
जळगाव महानगरपालिका आयुक्त
जिल्हा नियोजन अधिकारी जळगाव
जिल्हा समाजकल्याण अधिकारी जळगाव
प्रकल्प संचालक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल

ठळक वैशिष्ट्ये:
सांघिक प्रयत्न: सर्व विभागांमधील उत्तम समन्वय आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा चतुर्थावृत्तीचा विक्रम शक्य झाला आहे.

पारदर्शकता आणि उत्तरदायित्व: जनतेचा प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी आणि विकासाच्या कामांसाठीच खर्च व्हावा, ही प्रशासनाची ठाम भूमिका या यशातून अधोरेखित झाली आहे.

सर्वांगीण विकास: या निधीच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

"सलग चार वर्षे १००% निधी खर्च करणे ही प्रशासनाची मोठी उपलब्धी आहे. हा सन्मान म्हणजे भविष्यात अधिक वेगाने आणि गुणवत्तेने काम करण्याची प्रेरणा आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाचे हे उत्तम उदाहरण आहे." मा. पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील

0
0 views

Comment