logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्रातील ओबीसी आमदार - खासदारांनी एकत्र यावे - उमेश कोर्राम

महाराष्ट्रातील ओबीसी आमदार - खासदारांनी एकत्र यावे - उमेश कोर्राम

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी विमुक्त भटक्या समाजासाठी सुद्धा स्वतंत्र कॉलम असावा यासाठी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. खासदार साहेबांचे जाहीर आभार मानले पाहिजे. कारण जातीय जनगणना जातिनिहाय व्हावी व ओबीसी समुदायासाठी स्वतंत्र कॉलम असावा म्हणून भारतात हजारोंच्या वर आंदोलने झालीत परंतु कालपासून सुरू झालेल्या जनगणेच्या पहिल्या टप्प्यात ओबीसी चा कॉलमच गायब आहे.
महाराष्ट्रात जनगणना १६ मे ते १४ जून २०२६ पर्यंत होणार आहे. अजूनही वेळ आहे. सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रित येऊन प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून जनगणनेत सुधारणा करावी व ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी मान्य करावी. अन्यथा ओबीसींना जनगणनेतून माघार घ्यावी लागेल असहयोग दाखवावा लागेल. त्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी आमदार - खासदारांनी एकत्र यावे असे प्रखर मत सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी व्यक्त केले आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
956 views

Comment