logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कावढे शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

साक्री तालुक्यातील जि.प. केंद्र शाळा कावढे (ता. साक्री, जि. धुळे) येथे आज अजय दादा यांच्या वाढ दिवसा निमीत्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार मंजुळताई गावीत तसेच गटशिक्षणाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पुस्तके व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार मंजुळताई गावीत यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन केले.
गटशिक्षणाधिकारी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शालेय जीवनात शिस्त व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेतील शिक्षकवर्गाने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

29
4375 views

Comment