logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*नागपूर शहरातील इंडेन गॅसचा भोंगळ कारभार उघड! ‘Delivered’ दाखवूनही सिलेंडर गायब — ग्राहक संतापला*!

*नागपूर शहरातील इंडेन गॅसचा भोंगळ कारभार उघड! ‘Delivered’ दाखवूनही सिलेंडर गायब — ग्राहक संतापला*!

+गजानन ढाकुलकर ) हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील डिगडोह–हिंगणा रोड परिसरात इंडेन गॅस वितरणातील गंभीर निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. ग्राहकाने नियमानुसार गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर त्याला बिल (Invoice) व DAC कोड प्राप्त झाला, तसेच सिस्टममध्ये “Delivered” असे दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सिलेंडर घरपोच पोहोचलेच नसल्याने ग्राहक संतप्त झाला आहे.

ग्राहक जी. आर. कोरी यांनी दिनांक

२७ मार्च रोजी गॅस बुकिंग केले होते. अनेक दिवस उलटूनही डिलिव्हरी न झाल्याने त्यांनी संबंधित एजन्सीकडे वारंवार संपर्क साधला, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यामुळे “Delivered” दाखवून प्रत्यक्षात सिलेंडर न देण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. नागरिकांकडून हा सरळ फसवणुकीचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, ग्राहकाने अधिकृत हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली तसेच ही बाब समोर आल्यानंतर आणि बातमी प्रकाशित होताच संबंधित एजन्सी.कडून तात्काळ सिलेंडर घरपोच देण्यात आला. या प्रकरणी गजानन ढाकुलकर यांच्या पाठपुराव्यामुळेच न्याय मिळाल्याचे सांगत डॉ. कोरी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सध्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, अशा प्रकारांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरमध्ये वाढत्या तक्रारींमुळे गॅस वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
57 views

Comment