logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

देवाडा मेन रोडचे अर्धवट काम ठप्प; पाणी साचून खड्ड्यांमुळे रहदारी धोक्यात, ग्रामस्थांचा संताप.

प्रतिनिधी / आकाश गेडाम
देवाडा येथे मेन रोडचे काम अडखडल्यामुळे परिसरातील रहदारी गंभीरपणे धोक्यात आली आहे. रस्त्यावरील अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते अधिक धोकादायक बनले असून, काही ठिकाणी हेच खड्डे जनावरांच्या थांबण्याचे ठिकाण झाले आहेत.

या परिस्थितीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा गावकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

0
17 views

Comment