logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाच्या वाणिज्य अभ्यास मंडळाची चार्टर्ड अकाउंटंट कार्यालयाला भेट.

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाच्या वाणिज्य अभ्यास मंडळाची चार्टर्ड अकाउंटंट कार्यालयाला भेट. रिसोड __ येथील उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य अभ्यास मंडळांने चार्टर्ड अकाउंटंट कार्यालय रिसोड येथे प्राचार्य डॉ. व्हि.बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 30 मार्च 2026 रोजी भेट दिली या भेटीदरम्यान वाणिज्य अभ्यास मंडळातील सर्व पदाधिकारी तसेच बी कॉम सेमिस्टर दोन, चार व सहा चे व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग अकरावा वाणिज्य चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. ए. जी. वानखडे तर प्रमुख मार्गदर्शक श्री. गणेश लोंढे (सी.ए.) हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दशरथ प्रजापती यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. कॉम. भाग एक, दोन व भाग तीन मधील अभ्यासक्रमातील सनदी लेखापाल कार्यालयास भेटीचे महत्व सांगितले. सर्वप्रथम चार्टर्ड अकाउंटंट माननीय श्री. गणेश लोंढे साहेब यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कार्यालयाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद दिले तसेच विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट याच्या कार्याविषयी आपल्या मनोगतातून महत्वपूर्ण व उपयुक्त माहिती दिली सीएच्या परीक्षे संबंधित माहिती सांगितली तसेच व्यापाऱ्यांच्या दैनंदिन व्यवहाराच्या नोंदी कशा कराव्या तसेच आयकर संबंधित कलम 80यू , 80जी, 80सीसीसी, आय.टी.आर. फाईल व कर कपाती संबंधी सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच आयकर रिटर्न्स फॉर्म कसा भरावा व मूल्यवर्धित कर किती टक्केवारी पर्यंत आकारण्यात येतो आणि एस.जी.एस.टी., सी.जी.एस.टी. कोणकोणत्या वस्तूंवर लागू आहे आणि कोणकोणत्या वस्तूंवर लागू नाही याबद्दलही सविस्तरपणे माहिती दिली, बॅलन्सशीट अद्ययावत ठेवण्याविषयी नियम सांगितले तसेच विविध विभागातून येणारे हिशोब लेखा तपासण्याचे काम चार्टर्ड अकाउंटंट कार्यालयामध्ये संगणकीकृत केले जातात असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले प्रा. डॉ. ए. जी. वानखडे यांनी अध्यक्षीय भाषणातुन कराचे प्रकार तसेच आयकर कोणत्या प्रकारचा कर आहे व आयकरात कशाप्रकारे सुट दिले जाते याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले व सिद्धांतिक ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ ज्ञानावर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली पुंड हिने तर आभार प्रदर्शन कु दिपाली मगर हिने केले यावेळी सर्व विद्यार्थी व वाणिज्य अभ्यास मंडळाच्यावतीने श्री. गणेश लोंढे साहेब आणि त्यांचे सहकारी श्री. अक्षय राऊत, आकाश अग्रवाल यांचे आभार व्यक्त करण्यात आले या भेटीदरम्यान महाविद्यालयातील प्रा. डॉ. ए. जी. वानखडे, प्रा. पूजा पाठक मॅडम, प्रा. डॉ. कोमल काळे मॅडम, प्रा. अरविंद मनवर , प्रा. दशरथ प्रजापती, प्रा. ज्ञानेश्वर मुंडे, श्री.ओंकार पुरी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवक सुनील चऱ्हाटे, व महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थी दीपाली मगर, दिव्या खंदारे, नम्रता जाधव, अभिषेक लोंढे, कार्तिक सावके, आरती पौळकर, प्रज्ञा कांबळे, आरजू दळवी, साक्षी सरनाईक यांनी मदत केली, सदर भेटी दरम्यान बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

15
600 views

Comment