logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*वानाडोंगरीत जमीन घोटाळा उघड — वृद्ध महिलेला न्यायासाठी संघर्ष*!

*वानाडोंगरीत जमीन घोटाळा उघड — वृद्ध महिलेला न्यायासाठी संघर्ष*!

हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात राहणाऱ्या सेवानिवृत्त कॅप्टन सिंधू रामकृष्ण नरुले यांच्या जमिनीवर शहाकार गृहनिर्माण सहकारी सोसायटीने बेकायदेशीर कब्जा करून प्लॉटिंग करत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत या जागेवर ग्रामपंचायत व नंतर नगरपरिषदेकडून विकासकामेही करून घेण्यात आल्याचा आरोप आहे.
नरुले यांनी अनेक वर्षे पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्यानंतर अखेर एका संवेदनशील अधिकाऱ्याने या प्रकरणाची दखल घेत सतीश भाऊराव शहाकार व स्वर्गीय सेवकराम दिनबाजी शहाकार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, या संपूर्ण प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधींनी मदतीसाठी पुढे न आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, हे प्रकरण लक्षात येताच ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत सोशल मीडियावरच मदतीचे आवाहन केले आहे. “जोपर्यंत नरुले यांची जमीन परत मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे शहाकार गृहनिर्माण संस्था तसेच बेकायदेशीर कामांना मंजुरी देणारी नगरपरिषद अडचणीत येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणामुळे त्या ग्राहकांनाही फटका बसू शकतो, ज्यांनी या सोसायटीकडून प्लॉट खरेदी केले आहेत. दरम्यान, अजूनही अनेक तक्रारी राजकीय दबावामुळे शासन दरबारी प्रलंबित असल्याची चर्चा आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
181 views

Comment