logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कोंबड्याची झुंज लावणारे 21 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद...

कोंबड्याची झुंज लावणारे 21 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद...


नगर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क) या बातमीची हकीगत अशी की,पो.नि/श्री. किरणकुमार कबाडी,स्था.गु.शा. अहिल्यानगर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी सपोनि/ हरिष भोये, पोउपनि/अनंत सालगुडे, पोउपनि/ समीर अभंग पोलीस अंमलदार सुरेश माळी, विष्णु भागवत भिमराज खर्से, प्रशांत राठोड, सागर ससाणे, चालक उमाकांत गावडे अशांचे पथक एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहीती काढुन कारवाई करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना पथकास पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी पोखर्डी गावाचे शिवारातील पिंपळगाव उजनी रोडवरील एका मोकळ्या जागेमध्ये कापडी मंडप टाकुन त्यामध्ये काही इसम पैशावर कोंबड्यांची झुंज लावुन त्यावर जुगार खेळत असुन सदर ठिकाणी जावुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.
या सुचनेप्रमाणे नमुद पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करता पोखर्डी गावाचे शिवारातील एका मोकळ्या जागेमध्ये कापडी मंडपामध्ये काही इसम कोंबड्यांची झुंज लावत असतांना व तेथे जमलेल्या लोकांपैकी काही लोक झुंजीवर पैसे लावत असतांना दिसुन आले.तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकुन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे 1) शुभम राजेश बोध वय-27 वर्षे ,रा. झेंडीगेट, अहिल्यानगर, 2) आशरफ बाहुला खान ,वय-50 वर्षे रा. आलमगीर ता.जि. अहिल्यानगर, 3) मोहम्मद उस्मान अली शेख,वय-40 वर्षे रा. महिम उन्नती सोसायटी, मुंबई, 4) अमजद युसुफ मगदुम ,वय-43 वर्षे रा. नागपुरचा येरवडा पुणे, 5) सय्यद अझर अक्तर वय-40 वर्षे रा. पंचपिर चावडी अहिल्यानगर, 6) रोहीत श्रीचंद गोहिर वय-33 वर्षे रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर, 7) संदिप ओमप्रकाश कुडीया वय-32 वर्षे रा. वसंत टेकडी अहिल्यानगर, 8) राम हिरालाल क्षत्रिय वय-46 वर्षे रा. भद्रकाली फुले मार्केट नाशिक, 9) तौफिक सिकंदर शेख वय-28 वर्षे रा. नेवसा खुर्द ता.नेवासा, 10) अजहर खुदाबक्श शेख वय-34 वर्षे रा. मुकुंदनगर अहिल्यानगर, 11) योगेश मनोहर छजलांनी वय-40 वर्षे रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर, 12) संतोष गणेश गोयल वय- 39 वर्षे रा. शाहापुर ता.जि. अहिल्यानगर, 13) विकी लक्ष्मण सुजगोहर वय-46 वर्षे रा. येरवडा पुणे 14) जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे वय- 40 वर्षे रा. भिवंडी जि.ठाणे 15) अमीन सरदार शेख वय-42 वर्षे रा. गजराजनगर ता.जि. अहिल्यानगर, 16) तुषार संतोष मुलतांनी वय-29 वर्षे रा. मगळवारपेठ पुणे, 17) समीर फिरोज शेख वय-22 वर्षे रा. अकोले नाका संगमनेर, 18) वसीम सलीम शेख वय-70 वर्षे रा. येरवडा पुणे, 19) गोविंद शाम राजुडीया वय-63 वर्षे रा. मंगळवारपेठ पुणे, 20) सोहेल कबीर सय्यद वय-38 वर्षे रा. मुकुंदनगर अहिल्यानगर, 21) उत्तम एकनाथ साळवे वय-40 वर्षे रा. देवळाली कॅम्प, नाशिक जि.नाशिक असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमांनी कोंबड्यांचे एकमेकांसोबत अवैध झुंज लावुन त्यावर पैशावर लावुन हारजितीचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळुन आले आहे. ताब्यातील इसमांकडुन 24,600/-रु कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींविरुध्द एम.आय.डी.सी. पो.स्टे. गु.र.नं. 225 /2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(ब) सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिंबध करण्याबाबत अधिनियम कलम 11(इ), एम. 2(एन) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
0 views

Comment