तुटलेली तार गोठ्यावर पडून पाथऱ्यात ०९ गायांचा मृत्यू; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...
तुटलेली तार गोठ्यावर पडून पाथऱ्यात ०९ गायांचा मृत्यू; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...
राहाता (शिवप्रहार न्यूज)- राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे विजेच्या तारेचा धक्का (करंट) लागून 9 गायींचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे जवळपास 8-9 लाखांचे नुकसान झाले आहे.
पाथरे बुद्रुक गावात काल सोमवार दि.30 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. विजेची तुटलेली तार थेट गोठ्यावर पडल्याने संजय भास्कर घोलप व सोपान लक्ष्मण घोलप यांच्या 9 गायींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 8 ते 9 लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाकडून तात्काळ पंचनामा करून एव्हढे मोठे आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015