logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*“स्वाभिमानाची स्त्री: भोंदुगिरीला नाही* , *अन्यायाला थेट उत्तर!”*

🙏 *जय भीम, जय शिवराय, जय लहुजी* , *जय आदिवासी* 🙏

*“स्वाभिमानाची स्त्री: भोंदुगिरीला नाही* , *अन्यायाला थेट उत्तर!”*

✍️ *लेखक – पँथर पत्रकार चंद्रकांत जगधने*

हा लेख मी स्वतः, पँथर पत्रकार चंद्रकांत जगधने, समाजासाठी आणि विशेषतः आपल्या लेकी-सुनांच्या सुरक्षिततेसाठी लिहित आहे. कारण समाजात स्त्रीचे स्थान किती मोठे आहे हे अनेकांना अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. स्त्री ही केवळ घर सांभाळणारी व्यक्ती नाही; ती कुटुंबाची शक्ती आहे, संस्कारांची जननी आहे आणि समाजाच्या भविष्यातील पाया आहे. आई, बहीण, मुलगी, पत्नी अशा अनेक रूपांतून ती घर उभं करते, पिढ्यांना संस्कार देते आणि समाजाला दिशा देते. म्हणूनच स्त्रीचा सन्मान राखणे म्हणजे माणुसकीचा सन्मान राखणे होय.
आपल्या महापुरुषांनीही स्त्रीच्या सन्मानाला मोठं स्थान दिलं आहे. संत तुकाराम महाराजांनी भक्तीबरोबरच सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग दाखवला. संत गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा, भोंदुगिरी आणि खोट्या देवदेवलाषांविरुद्ध आयुष्यभर लढा दिला आणि समाजाला स्वच्छ विचार देण्याचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीला आईसमान मानून तिच्या सन्मानाचे कठोर रक्षण केले, आणि राज्यकारभारातही स्त्रीचा मान अबाधित ठेवला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा मार्ग उघडून स्त्रीला स्वाभिमानाने जगण्याची ताकद दिली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रीला समान हक्क, न्याय आणि सन्मानाचा अधिकार दिला. या महापुरुषांच्या विचारांमधून एकच स्पष्ट संदेश मिळतो — स्त्री ही समाजाची ताकद आहे, तिच्यावर अन्याय होऊ देणे म्हणजे समाजाच्या मूल्यांवर आघात होणे.
पण दुर्दैवाने आजही काही ठिकाणी स्त्रियांना फसवण्याचे, त्यांना भोंदुगिरीच्या जाळ्यात अडकवण्याचे, देव-देवलाषांच्या नावावर त्यांची दिशाभूल करण्याचे प्रकार घडतात. काही भोंदू लोक श्रद्धेचा गैरफायदा घेतात आणि महिलांना अंधश्रद्धेच्या मार्गावर ढकलतात. ही गोष्ट अत्यंत धोकादायक आहे. म्हणूनच मी या लेखातून महिलांना स्पष्ट आणि ठाम संदेश देत आहे — कोणत्याही भोंदुगिरीच्या, अंधश्रद्धेच्या किंवा खोट्या देवदेवलाषांच्या नादी लागू नका. श्रद्धा ही माणसाला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी असते, पण जेव्हा श्रद्धेच्या नावावर फसवणूक सुरू होते तेव्हा त्या गोष्टीला धैर्याने नकार देणे आवश्यक असते.
महिलांनो, तुमची सुरक्षितता आणि तुमचा स्वाभिमान हा सर्वात मोठा आहे. कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका. शिक्षण, जागरूकता आणि स्वाभिमान हीच तुमची खरी ताकद आहे. जर कुणी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला किंवा अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तर शांत बसू नका. अन्यायाच्या विरोधात उभे राहा, आवाज उठवा आणि योग्य मार्गाने न्यायासाठी लढा द्या. कारण अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला बळ देणे होय.
मी, पँथर पत्रकार चंद्रकांत जगधने, या लेखातून विशेषतः महिलांना एक स्पष्ट संदेश देत आहे — स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा, स्वतःच्या ताकदीवर उभे राहा आणि कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका. तुमचं स्थान समाजात अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या धैर्यात, तुमच्या शिक्षणात आणि तुमच्या जागरूकतेत समाजाची खरी ताकद आहे.
समाजालाही मी या लेखातून एक ठाम इशारा देत आहे — स्त्रीचा सन्मान राखा, अंधश्रद्धा आणि भोंदुगिरीला थारा देऊ नका आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी जागरूक राहा. कारण ज्या समाजात स्त्री सुरक्षित, जागरूक आणि स्वाभिमानाने जगते, तो समाजच खऱ्या अर्थाने मजबूत, प्रगत आणि न्यायपूर्ण बनतो. 🙏 *जय भीम* 🙏

✍️ *लेखक, पॅंथर, पत्रकार चंद्रकांत* *जगधने*

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

6
223 views

Comment