logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*इसासनीत वाढत चाललेला जमीन वाद – प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मारहाणीपर्यंत प्रकरण*!

*इसासनीत वाढत चाललेला जमीन वाद – प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मारहाणीपर्यंत प्रकरण*!

हिंगणा रोडवरील शांतीनगर इसासनी परिसरात जमीन वादातून गंभीर घटना समोर आली आहे. संतोष गोपीचंद कटरे (वय ४९ वर्ष ) शांतीनगर झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या अवैध जमीन व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर ते घटनास्थळी गेले असता काही जणांनी त्यांना अडवून मारहाण केली. मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याच्या कारणावरून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणातील गैर अर्जदार म्हणून इंदुबाई चौधरी, सिद्धार्थ बागडे, राहुल कुलसंगे आणि मिलिंद प्रधान यांची नावे समोर आली आहेत. जखमी अवस्थेत कटरे यांनी ११२ वर कॉल करून मदत मागितली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या खांद्याला दुखापत झाल्याचे सांगितले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, स्थानिक तालुका व जिल्हा प्रशासनाकडे शासकीय जमिनीवर अतिक्रमणाबाबत अनेक तक्रारी यापूर्वीच सादर करण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामुळेच अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून परिसरात भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संबंधितांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण व अवैध व्यवहारांवर लगाम घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
187 views

Comment