logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

व्हॉइस ऑफ मीडीया’चा ध्यास, पत्रकारांचा श्वास काळे सरांच्या मार्गदर्शनाने उजळला संवादाचा प्रवास

‘व्हॉइस ऑफ मीडीया’चा ध्यास, पत्रकारांचा श्वास
काळे सरांच्या मार्गदर्शनाने उजळला संवादाचा प्रवास

अमळनेर प्रतिनिधी :
व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्वेसर्वा तथा आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मा. संदीपजी काळे सर हे केवळ पदावर विराजमान असलेले नेतृत्व नसून, प्रत्येक पत्रकाराच्या मनात आपलेपणाने स्थान निर्माण करणारे जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ७८ देशांमध्ये विस्तारलेल्या या भव्य संघटनेच्या प्रत्येक सदस्याशी त्यांची जुळलेली नाळ ही त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे.
प्रत्येक पत्रकाराची नावानिशी ओळख ठेवणे, त्यांच्या कामाची वेळोवेळी दखल घेणे आणि अडचणींची आत्मीयतेने विचारपूस करणे—ही त्यांची कार्यशैलीच वेगळी ठरते. त्यामुळेच संघटनेला त्यांनी एक सशक्त कुटुंबाचे स्वरूप दिले असून, प्रत्येक सदस्याला “आपलेपणाची ऊब” देणारे ते खऱ्या अर्थाने ‘बापमाणूस’ ठरतात.
सतत अभ्यासू वृत्ती, अहवालांवर बारकाईने लक्ष आणि संघटनेच्या प्रगतीसाठी अखंड धडपड—या गुणांमुळे त्यांचे कार्य आज अनेक पत्रकारांसाठी प्रेरणास्थान बनले आहे.
अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाशी पत्रकार मित्र अविनाश खंडारे सर, “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” प्राप्त पत्रकार ईश्वर महाजन तसेच मुंदडा हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर विंचूरकर यांना स्नेहपूर्वक चर्चा करण्याचा योग लाभला.
या भेटीत काळे सरांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले, तर त्यांच्या साधेपणाने आणि आत्मीय संवादाने उपस्थितांची मने जिंकली. पत्रकारितेतील मूल्ये, संघटनात्मक बांधिलकी आणि सकारात्मक दृष्टिकोन याबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले.

ही भेट केवळ औपचारिक न राहता, एक संस्मरणीय अनुभव ठरली असून, अशा महान व्यक्तिमत्त्वाशी झालेला संवाद आयुष्यभर प्रेरणा देणारा ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

3
100 views

Comment