logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

साकेगाव शाळा प्रशासनाचा मनमानी कारभार; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी क्रूर खेळ!

प्रतिनिधी:
साकेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक आणि प्रशासनाच्या गलथानपणामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये या विद्यार्थ्यांना वर्षभर 'सेमी-इंग्रजी' माध्यमातून शिक्षण देण्यात आले. मात्र, बोर्डाचे परीक्षेचे फॉर्म भरताना शाळा प्रशासनाने मोठी चूक करून ते 'मराठी' माध्यमातून भरले.
दिनांक ६ मार्च २०२६ रोजी गणिताच्या पेपरच्या वेळी हा प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नपत्रिका देण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेताच, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांनी त्यांना मदत करण्याऐवजी चक्क एका हॉलमध्ये कोंडून ठेवले. तब्बल एक तासानंतर काही विद्यार्थ्यांना सेमी-इंग्रजी तर काहींना मराठी पेपर देऊन दमदाठी करत तो सोडवण्यास भाग पाडले. या एका तासाच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे.मुख्याध्यापकांनी आपली चूक सुधारण्यासाठी पुण्याला जाऊन बोर्डात 'आर्थिक तडजोड' केल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संस्थेचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचे विधानपरिषद सदस्य असल्याने, शिक्षण विभाग आणि भरारी पथक या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणाची दखल घेत काल, ३० मार्च रोजी मनसेचे तालुका उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण आश्रू डांगे यांनी जिल्हाधिकारी आशिया सर यांची भेट घेतली. या शाळेवर यापूर्वीही प्रशासक नेमण्यात आला होता, याची आठवण करून देत त्यांनी मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.
"आमच्या मुलांच्या भवितव्याशी खेळ झाला आहे. जर दोषींवर कारवाई झाली नाही, तर विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'घंटानाद आंदोलन' करण्यात येईल," असा इशारा पीडित पालकांनी दिला आहे.

72
7271 views

Comment