तीन दिवस होणार दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी
जळगाव : जिल्ह्यातील दिव्यांग
व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी येणाऱ्या अर्जदारांची तपासणी वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळामार्फत दर बुधवारी करण्यात येत होती. मात्र, यापुढे ही तपासणी सोमवार ते शुक्रवार या चार दिवसांच्या कालावधीत होणार आहे.
दिव्यांग व्यक्तींची होणारी गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने आता हा निर्णय बदलण्यात आला आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिव्यांग विभागाकडून भ्रमणध्वनीद्वारे संदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित दिव्यांगबांधवांनी सूचनेनुसार संबंधित तारखेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात उपस्थित राहावे लागेल.