लोकांची डोकेदुखी वाढणारे तहसील कार्यालयाचे स्थलांतर हे गावाबाहेर न करता शहराच्या मध्यभागी करा - धनाजी जोशी
लोकांची डोकेदुखी वाढणारे तहसील कार्यालयाचे स्थलांतर हे गावाबाहेर न करता शहराच्या मध्यभागी करा - धनाजी जोशी
देगलूर प्रतिनिधी-
नांदेड जिल्ह्यातील सर्वांत मोठा असलेल्या उपजिल्हा देगलूर येथिल तहसील कार्यालय हे एका बड्या नेत्यांच्या स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करुन गावाबाहेरील असलेल्या तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात घेऊन जाण्याच्या मार्गावर हलचाली सुरू झाल्या असून प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी व कार्यालयातील उच्च अधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केल्याचे छायाचित्रे देगलूर वासियांनी पाहिले असुन हे जर तहसील कार्यालय गावाबाहेर गेले तर जनतेचे मोठी डोकेदुखी वाढणार व खिश्याला आर्थिक झळ सुध्दा बसणार,कारण सरकारी काम सहा महिने थांब,या म्हणी प्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला एका कामासाठी जर तहसील पाच चकरा माराव्या लागल्या तर एक वेळा ॲटो 100 रु म्हणजे 5 वेळा 500 रुपये लागणार हि रक्कम सामान्य माणसाला परवडणारे नसुन तेवढे ,लांब (3 कि.मी)चालत जाऊ पण शकत नाही याकरिता देगलूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून हि मागणी रास्त आहे.कारण तहसील कार्यालय हे जर शहराच्या मध्यभागी ठेवले तर ,नागरिकांना उपजिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस,न्यायालय,हि कार्यालय हाकेच्या अंतरावर राहतील व नागरिकांना हेलपाटे होणार नाही याकरिता देगलूरचे तहसील कार्यालय हे गावाबाहेर स्थलांतर न करता शहराच्या मध्यभागी उभारण्यात यावे, अन्यथा देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांच्या वतीने कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे..
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015