logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

परळीकरांच्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा इंजि. राजू जगतकर यांची आयर्लंड (UK) येथे डेप्युटी डायरेक्टर पदावर निवड

परळीकरांच्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा
इंजि. राजू जगतकर यांची आयर्लंड (UK) येथे डेप्युटी डायरेक्टर पदावर निवड

परळी प्रतिनिधी - परळी शहरातील भीमनगर येथील भूमिपुत्र आणि मेकॅनिकल इंजिनीयर इंजि. राजू श्रावणराव जगतकर यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवत परळीकरांचा अभिमान उंचावला आहे. त्यांची यूरोपमधील आयर्लंड (UK) येथे सुरू असलेल्या अत्याधुनिक मेट्रो रेल्वे प्रकल्पात डेप्युटी डायरेक्टर पदावर निवड झाली आहे.

या प्रकल्पांतर्गत सुमारे ११० किलोमीटर लांबीची, अत्याधुनिक आणि मानवचालकविरहित (Driverless) मेट्रो रेल्वे उभारली जाणार असून या महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी इंजि. जगतकर यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कतार (दोहा) येथे बुलेट मेट्रो रेल्वे प्रकल्पात असिस्टंट डायरेक्टर म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.

अत्यंत कमी वयात एवढ्या उच्च पदावर पोहोचणे ही बाब परळीकरांसाठी अभिमानास्पद असून तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. भीमनगर व जगतकर गल्ली परिसरात आज मोठ्या प्रमाणात इंजिनिअर तयार होत आहेत किंवा शिक्षण घेत आहेत. या सर्वांसाठी इंजि. राजू जगतकर हे प्रेरणास्थान ठरत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असूनही त्यांची साधेपणा आणि माणुसकी जपण्याची वृत्ती विशेष लक्षवेधी आहे. विदेशात उच्च दर्जाच्या जीवनशैलीत वावरणारे इंजि. जगतकर गावी आल्यावर सर्वसामान्यांप्रमाणेच साधे जीवन जगतात, ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.

ते आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई कासुमाय, वडील श्रावणराव जगतकर, बंधू नवनाथ जगतकर आणि पत्रकार बालाजी जगतकर यांना देतात. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत.
“शिक्षणाच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच माझे आदर्श आहेत,” असे ते आवर्जून सांगतात.

इंजि. राजू जगतकर यांच्या या यशामुळे परळी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे मार्गदर्शन आगामी काळात विद्यार्थ्यांना लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
231 views

Comment