logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

78,82,184 ₹ चे 470 कापडी रोल जप्त, नगर LCB ची राजस्थानात धडक कारवाई...

78,82,184 ₹ चे 470 कापडी रोल जप्त, नगर LCB ची राजस्थानात धडक कारवाई...


नगर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क) या बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी अमरिशकुमार गुप्ता वय-57 वर्षे रा.अहमदाबाद,राज्य-गुजरात यांच्या कंपनीतील कंटेनर गाडीवर असलेले चालक नामे संजय लिलाधर कुमार व क्लिन्नर नामे लिलु मिना उर्फ नंदलाल मिना यांनी संगनमत करुन फिर्यादीचे कंपनीचे एकुण 555 कापडाचे रोल बेंगलोर येथे घेवुन जाण्याकरीता विश्वासाने सोपवलेले असतांना आरोपीतांनी नमुद 470 कापडाचे रोल बेंगलोर येथे न पोहचवता ते परस्पर स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता वापरले. त्यांची एकुण किंमत 78 लाख 82 हजार 184 रुपये इतकी आहे. याघटनेबाबत कोतवाली पोलीस ठाणे गु. र. नं. 210/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316 (4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पो.नि.किरणकुमार कबाडी,स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचे शोध घेवुन तात्काळ ताब्यात घेवुन त्यांचेकडुन मुद्देमाल हस्तगत करणे बाबत आदेशीत केलेले आहे. पोनि श्री. कबाडी यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचे शोध होणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार, सुनिल पवार, रिचर्ड गायकवाड, फुरकान शेख, भगवान थोरात, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक उमाकांत गावडे,अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्ह्यातील आरोपीचे व मुद्देमालाचे शोध होणे कामी सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवान केले होते.वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन, गुन्ह्यातील आरोपींची माहिती संकलित करुन आरोपींची माहिती काढत असतांना पथकास व्यवसायिक कौशल्य व गुप्त बातमीदारामाचे मार्फत सदर गुन्ह्यातील आरोपींनी नवापुर जि. नंदुरबार या ठिकाणी वाहन उभे करुन त्यातील मुद्देमाल दुस-या वाहनात भरुन अपहार केले बाबत माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ नवापुर येथे जावुन तेथुन सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले व गोपनिय माहिती प्राप्त केली.त्याठिकाणापासुन पथकाने कुठलाही विलंब नकरता तात्काळ जयपुर राजस्थानपर्यंत सलग चार दिवस सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली व गुन्ह्यातील आरोपी नामे संजय लिलाधर कुमार व लिलु मिना उर्फ नंदलाल मिना यांचे शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. त्यानंतर व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हे इसम नामे मोहम्मद युनुस सलाउद्दीन रा. तालछापर ता. सुजानगढ, जि. चुरु राजस्थान व त्याचे साथीदार यांचेकडे लपवुन ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने राजस्थान येथे जावुन इसम नामे मोहम्मद युनुस सलाउद्दीन रा. तालछापर ता. सुजानगढ, जि. चुरु राजस्थान याचे शोध घेतला असता इसम नामे 1) मोहम्मद युनुस सलाउद्दीन वय-49 वर्षे रा. तालछापर, ता.सुजानगढ, जि.चुरु राजस्थान, 2) बाबुलाल जिवनराम जाट वय-32 वर्षे रा. रनधिसर ता.सुजानगढ, जि.चुरु राजस्थान, 3) मोहम्मद अमिर सज्जाद वय -33 वर्षे रा. चुडीमियाँ ता.लक्ष्मणगढ, जि.सिकर राजस्थान हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन नमुद गुन्ह्यातील मुद्देमाला बाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता वरील इसमाने सांगितले की, 4) संजय लिलाधर कुमार व 5) लिलु मिना उर्फ नंदलाल मिना यांनी अपहार केलेला मुद्देमाल हा मनोहारठाणा जि.झालवाड,राजस्थान याठिकाणी लपवुन ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता. मिळुन आलेल्या इसमांकडुन 78,82,184/-रु कि.चे एकुण लहान मोठे 470 कापडाचे रोल असा गुन्ह्यातील अपहार झालेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नमुद आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment