Aima midiya jan jan ki avaj Date 30.3.2026 am 1:30
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा भाजपाला दणका; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरू
Aima midiya jan jan ki avaj Date 30.3.2026 am 1:30
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा भाजपाला दणका; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरून मित्र पक्षांतील वातावरण ‘दूषित’?
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मित्रपक्ष भाजपाला पहिला दणका दिला आहे.पुणे: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मित्रपक्ष भाजपाला पहिला दणका दिला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुण्यातील उप प्रादेशिक कार्यालय बारामती येथे स्थलांतर करण्यात आले आहे. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राची सूत्रे आता पुण्याऐवजी बारामतीच्या हातात गेली आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरून आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि भाजपमधील वातावरण ‘दूषित’ झाल्याची चर्चा राजकीय रण ‘दूषित’?
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मित्रपक्ष भाजपाला
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा भाजपला दणका (संग्रहित छायाचित्र)
पुणे: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मित्रपक्ष भाजपाला पहिला दणका दिला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुण्यातील उप प्रादेशिक कार्यालय बारामती येथे स्थलांतर करण्यात आले आहे. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राची सूत्रे आता पुण्याऐवजी बारामतीच्या हातात गेली आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरून आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि भाजपमधील वातावरण ‘दूषित’ झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यी पुणे विभागाच्या अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय एक आणि दोन; तसेच प्रादेशिक प्रयोगशाळा ही कार्यालये पुण्यात वाकडेवाडी येथील जोग सेंटरमध्ये आहेत. त्यापैकी उपप्रादेशिक कार्यालय एक हे आता बारामती येथील भिगवण रस्त्यावरील यश प्राईम या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेऊन भाजपाला दणका दिल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या उपप्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्योगिक वसाहती;तसेच महापालिकेच्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहती यांचे कामकाज पाहिले जाते. ‘एमआयडीसी’च्या भोर, जेजुरी, सासवड, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांमध्ये; तसेच मालेगाव नगरपंचायतीच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती आहेत. या परिसरामध्ये लहान-मोठे ५१७२ उद्योग आहेत. कुरकुंभ, बारामती, जेजुरी आणि इंदापूर या चार ‘एमआयडीसी’च्या औद्योगिक वसाहती; तसेच कात्रज औद्योगिक वसाहत, हडपसर औद्योगिक वसाहत, रामटेकडी औद्योगिक वसाहत, पर्वती औद्योगिक वसाहत आणि कोथरूड औद्योगिक वसाहत या पाच पुणे महापालिकेच्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतींमध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला, तर तो सोडवण्यासाठी आता बारामतीला जावे लागणार आहे. नव्याने कोणतीही परवानगी घेण्यासाठीही पुणे शहरातील नागरिकांना; तसेच पुण्याजवळील भोर, जेजुरी, सासवड येथील नागरिकांनाही बारामती येथे जावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय ९ मार्च रोजी घेऊन २० मार्च रोजी या कार्यालयाचे बारामती येथे स्थलांतर देखील झाले. त्यानंतर ही बाब चर्चेत आली.निर्णय कोणी घेतला?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी या निर्णयाला आक्षेप घेतला असून याबाबची तक्रार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.
याबाबत हेमंत संभूस म्हणाले, ‘हा निर्णय घेण्यापूर्वी लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. तसेच याबाबत हरकती आणि सूचना घेणे अत्यावश्यक होते. मात्र, याबाबत कोणालाही कल्पना न देता कार्यालय स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुण्यातील नागरिकांना बारामती येथे जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याबाबतची तक्रार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. त्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनाही याबाबतची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेऊन हा निर्णय घेण्यात आला का, असे प्रश्न निर्माण होत आहेत.’
बारामतीत स्वतंत्र विभाग सुरू करा
भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघामध्ये हे कार्यालय आहे. हे कार्यालय स्थलांतरीत करण्यास आमदार शिरोळे यांनीही विरोध केला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविले आहे. याबाबत आमदार शिरोळे म्हणाले, ‘हे कार्यालय स्थलांतरित करण्याऐवजी बारामतीमध्ये स्वतंत्र विभाग सुरू करावा, अशी मागणी केली आहे. तसे पत्र पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविले आहे.’