हिंगोलीत राजश्री शाहू कॉलेजला भीषण आग; संगणक लॅब व कार्यालय जळून खाक, २५-३० लाखांचे नुकसान
तोडे पाटील शंकरनगर
हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागात असले
हिंगोलीत राजश्री शाहू कॉलेजला भीषण आग; संगणक लॅब व कार्यालय जळून खाक, २५-३० लाखांचे नुकसान
तोडे पाटील शंकरनगर
हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागात असलेल्या राजश्री शाहू आर्ट्स, कॉमर्स व आयटी कॉलेजमध्ये शनिवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कॉलेजचे कार्यालय, महत्त्वाचे दस्तऐवज तसेच संगणक लॅबमधील सर्व संगणक जळून खाक झाले असून सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एशिया ग्रुपमधील महिला मंडळ, जालना यांच्या वतीने संचलित या कॉलेजमध्ये ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. कॉलेजमध्ये अत्याधुनिक संगणक लॅब असून शनिवारी नेहमीप्रमाणे दिवसभर वर्ग पार पडले. मात्र सायंकाळी अचानक कार्यालयातून धूर निघताना दिसला आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.
आग वेगाने पसरत कार्यालयातून संगणक लॅबपर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी तात्काळ पालिकेला कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अग्निशमन प्रमुख अक्षय तांडेल, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. तसेच पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.
सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कार्यालयातील सर्व कागदपत्रे, संगणक व लॅबमधील १० पेक्षा अधिक संगणक पूर्णतः जळून खाक झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संस्थेचे अध्यक्ष आसीफ कुरेशी यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, या आगीत सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तिरुपती नगर येथील राजश्री शाहू आर्ट्स, कॉमर्स व आयटी कॉलेजला शनिवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागली
संगणक लॅबमधील सर्व संगणक जळून खाक
महत्त्वाची कागदपत्रे नष्ट तब्बल २५ ते ३० लाखांचे नुकसानशॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाचे २ तास प्रयत्न सुदैवाने जीवितहानी टळली विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान घटनेची चौकशी होणार का?
— प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे!