निमगाव येथे आरोग्य निदान, मोफत औषधी वितरण व समुपदेशन कार्यक्रम यशस्वी
निमगाव येथे आरोग्य निदान, मोफत औषधी वितरण व समुपदेशन कार्यक्रम यशस्वी
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- सद्गुरू जोग महाराज गुरुकुल निमगाव (पहेला ) ता. भंडारा येथे आज रविवारला आरोग्य निदान, मोफत औषधी वितरण व समुपदेशन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
आरोग्य तपासणी पूर्वी डॉ. संजय मानकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य व सांघीक आरोग्याबद्दल विस्तृत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. सोबतच सेवांकुर नागपूर ह्या संस्थेच्या सदस्यांना, प्रशिक्षणार्थींना डॉ संजय मानकर यांनी मार्गदर्शन केले .
संपूर्ण शिबिर श्री. ह.भ. प. ओमदेव चौधरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. औषधी वितरण श्री . रविभाऊ, श्री रेवानाथ यांनी केले . रुग्णांची नोंदणी श्री. सागर यांनी केली. सेवांकुर संस्थेचे डॉ. मयुर आडे, डॉ. हटवार व इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य केले .
डॉ. संजय मानकर सरांनी विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दैनंदिनी लेखन, पुरेशी ६ ते ७ तास झोप , योगासन, ध्यान धारणा, नियमित व्यायाम, नियमित अभ्यास, आहार विहार, ऋतुनुसार फळे व भाज्या खाने, कोमट पाणी पिने इत्यादी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
गुरुकुलातील पोषण आहार तयार करणाऱ्या भगिनी - सेवेकरी यांचे सुद्धा आरोग्य परीक्षण करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आली. सर्व रुग्णांना खाऊ वाटप करण्यात आले. शिबिराच्या शेवटी श्री. शशिकांत हजारे यांनी सर्वांचे आभार मानले. संपूर्ण शिबिर आल्हाददायक वातावरणात पार पाडले. श्री. संजय एकापुरे सरांचे आभार समाज जागृती प्रतिष्ठान व सेवांकुर संस्थेचे श्री. ह. भ. प. ओमदेव चौधरी महाराजांनी हार्दिक आभार मानले. उपरोक्त संस्थेनी दरवर्षी आरोग्य शिबिर घेण्याचे ठरविले.
सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. सौ. सिमाताई ओमदेव चौधरी व इतर भगिनींनी फार मोलाचे सहकार्य केले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015