logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दक्षिण काशी श्री क्षेत्र शिरूर ताजबंद येथील महादेव यात्रेस प्रारंभ . हाजारो भाविकांची उपस्थिती . उद्या शिवपार्वती विवाह सोहळा.

दक्षिण काशी शिरूर ताजबंद श्री श्रेत्र महादेव यात्रेस सुरुवात. ( शिरूर ताजबंद विशेष प्रतिनिधी शिवाजी श्रीमंगले ). लातूर ( रत्नापूर ) जिल्हयातील अहमदपूर ( राजूर वरंवाळ ) तालुक्यातील श्री क्षेत्र शिवऊर ( शिरूर ताजबंद ) येथील श्री महादेव यात्रा रविवारी एकादशिला प्रारंभ, बारशीला सोमवारी शिवपार्वती विवाह सोहळा- अखंड हारिनाम सप्ताह सांगता . मंगळवारी महाप्रसाद . चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला यात्रेची सांगता होते . जाजवल्य व स्वंयभू शंकराचा महिमा लाखो भाविकांचे श्रध्दास्थान या शिवऊर ला ( शिव म्हणजे महादेव - ऊर म्हणजे गाव ) दक्षिण काशी म्हणुन भक्तगण उल्लेख करतात या विषयी थोडोसे वृतांत मिळालेली माहीती अशी . चैत्र महिन्यात येणाऱ्या एकादशि ला श्री शंभो महादेव यात्रेस प्रारंभ होतो .गावात काठी कावडया पाडव्या पासून बसतात . मुळ निवासी व परिसरातील लाखो भाविक 12 दिवसाचा गुडी पाडवा पासून महादेवा चा उपवास करतात . श्री श्रेत्र महादेव ( महेश ) मंदिरात दैनंदिन पूजा - आरती - अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक कार्यक्रम पार पडतात तसेच ई . स. 1954 पासून अखंड हरिनाम चालू आहे . हरिनाम सप्ताहाची सुरुवात तिथी नुसार षष्ठीला होत असते व त्रेवो दशीला भंडारा महाप्रसाद गाव व परिसरात भाविकांना देण्यात येतो . हि परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे . देवस्थान मंदिर कमिटीचे अध्यक्ष राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व सर्व कार्यकारी मंडळ, व्यवस्थापक, मानकरी, सालकरी भाविकासाठी उत्कृष्ठ व्यवस्था करीत असतात . गावची परंपरा जपण्यासाठी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या सह तसेच तत्कालीन दानशूर व्यक्ती कै.भगवानराव पाटील, कै . काशिनाथराव पाटील,कै . गोविंदराव भोसले ( गवळी ), कै . गोविंदराव पडोळे, पाटील,डोंगरे,बिलापटे, भातीकरे, कापसे,महापूरे,शिंदे, खेडकर, जाधव, भूरे, जाजू, बलशेटवार, उडतेवार, गुळवे, पांचाळ, महागावे,टमके, स्वामी, जोशी, श्रीमंगले,आदींचा परिवार गावकरी, ग्रामस्थ युवा कार्यकर्ते सहभागी होतात . प्राचीन काळापासून येथे तसेच महादेववाडी व तिर्थ ( धानोरा )या गावी महादेवाचे मंदिर आहे . येथील स्वंयभू महादेवाची पिंड असलेले महादेवाचे मंदिर व तिर्थकुंड आहे . महादेव भक्तांच्या वासत्वाने पूर्णात झालेली पावनभूमी पवित्र भुमी म्हणुन शिवऊर ( शिरुर ता.)ला तिर्थक्षेत्र म्हणुन गणले जाते . येथील महादेव दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे . दरवर्षी (कोरोना वर्ष )अपवाद सोडून यात्रा भरते . श्रावण महिन्यात तर दर्शनासाठी पूजा अभिषेक साठी महिनाभर लाखो भाविक हजेरी लावतात . अखंड हरिनाम - शिवनाम सप्ताह किर्तन भजन भागवत कथा रामायणाचे जपतपाचे आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मंदिरात होत असतात . अन्नदान मोठ्या प्रमाणात होते . परिसरातील पर जिल्हयातील शेकडो दिंड्या येथे येतात थांबतात दर्शन प्रसाद घेवून पूढे पंढरपूर देहु आळंदी शिर्डी केतकीसंगमेश्वर कपीलधारकडे जातात . शिवपार्वती मंगल कार्यालय म्हणजे भाविकांची मोठी सोय . धार्मिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळा तसेच ईतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे . मंदिर व मंगल कार्यालयाचे अजूनही भव्य दिव्य बांधकाम अनेक वर्षापासून चालू आहे . दानशूर भाविक तसेच ईतर लोकांनी बांधकाम साठी मोठ्या प्रमाणात निधीही दिला अजून देतच आहेत . सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे अध्यक्ष झाल्या बरोबर देवस्थान कमिटी व गावकरी जेष्ट लोकांशी चर्चा करून मंगल कार्यालय तसेच मंदिराची भव्यदिव्य आकर्षक सभाग्रह उभारणी बांधकाम चालू आहे . तत्कालीन खासदार . डॉ . गोपाळराव पाटील यांनी ही मंगल कार्यालय सभाग्रहासाठी खासदार निधी दिला . निधी मिळवून घेण्यासाठी त्यासाठी कार्यकर्ते बालाजी पडोळे, गणेश कापसे व कै . गोविंद पाटील, कै . हरिश्चंद्र बलशेटवार यांनी मोलाचे सहकार्य केले . मंदिर कमिटी चे अध्यक्ष ना . पाटील यांनी मंदिर - मंगल कार्यालय तसेच परिसर शुशोभिकरणासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे यामुळे विविध कामे प्रगतीपथावर आहेत . मंगल कार्यालयाचे आल्प दर असल्याने कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नागरीक करतात . व्यवस्था खुप मोठी आहे सर्व सुविधा मिळतात . बारा ज्योतीर्लिग देवस्थान एवढी भाविकांची प्रचंड गर्दी असते . शिवपार्वती विवाह सोहळा मध्यरात्री 12 वाजता होतो लाखो भाविक राज्यातून येथे येतात . तसेच विविध राजकिय पक्षाचे, सामाजिक संघटनेचे गाव परिसरातील लोक तरुण वर्ग स्वंयसेवक सेवाभाव कार्य करतात . येथील पत्रकार,छायाचित्रकार मित्र अनेक वर्षापासून यात्रा स्पेशल तसेच मंदिर बाबत वृत संकलन करून प्रसिद्धी देतात . शंभो महादेवाची यात्रा सर्व जातीधर्माच्या सहकार्याने पार पडते हे विशेष आहे . विशेष वृत पुढील भागात.

65
1697 views

Comment